तहान लागली भूमीला
तहान लागली भूमीला
तहान लागली भूमीला
आठवण झाली जलाची
विनवणी करू लागली मुळे
जलाविणा सुकू लागली कोमल फुले
झाले भाष्प पाण्याचे
पहावत नव्हते दिवस कष्टकऱ्यांचे
फिकी पडत होती ञृणमात्रा
घनाळीचा हवा होता सहारा
तहान लागली भूमीला
आठवण झाली जलाची
कोरड पडली घशाला
पाणीच नव्हते झर्याला
भाष्पांचे झाले ढग
मेघांनाच पाहून ओरडू लागले खग
वाऱ्याने दिली साथ नभांला
पाऊस पडला एक-एक कोसाला
तहान लागली भूमीला
आठवण झाली जलाची
