*तेव्हा तुझी खुप आठवण येते*
*तेव्हा तुझी खुप आठवण येते*
आकाशाने चांदणे पांघरले,
वारा मंद मंद वाहतो,
तेंव्हा तुझी खुप आठवण येते....
क्षितिजावर लुकलुकणारा,
एक तारा जेव्हां पहाते,
तेंव्हा तुझी खुप आठवण येते...
बेभान कोसळणाऱ्या ,
मुक्त पावसाच्या सरी पहाते,
तेंव्हा तुझी खुप आठवण येते ...
ओल्या मातीचा सुवास,
श्वासात दरवळतो,
तेंव्हा तुझी खुप आठवण येते......
बेधुंद करणाऱ्या,
रातराणीचा सुगंध दरवळतो,
तेंव्हा तुझी खुप आठवण येते....
उसळणारा बेछुट दर्या, आणि
शांत जलाशयातील तरंग पहाते
तेव्हा तुझी खूप आठवण येते....
वारा कसा मंद मंद वाहतो...
मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो...
तेंव्हा तुझी खुप आठवण येते.....
सरी कशा थेंब थेंब बरसतात...
मनाला कशा चिंब चिंब भिजवतात
तेव्हा तुझी खुप आठवण येते......
मोगरा ही गंध गंधित होतो...
मनाला ही धुंद मोहरून नेतो,
तेव्हा तुझी खुप आठवण येते .......
अश्रु ही कसे झर झर झरतात...
तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात...
जेव्हां तुझी खुपआठवण येते.....
स्पंदनंचा ताल ताल हरवतो
प्रीत गीतांचा सुर ही ना गवसतो,
जेव्हां तुझी खुप आठवण येते.......
मीच माझ्यात हारऊन जाते
तुझ्या आठवणीत एकरूप होते
जेव्हां तुझी खुप खुप आठवण येते.................

