तडजोड ,,,, कविता 52 आठवडे स्पर
तडजोड ,,,, कविता 52 आठवडे स्पर
तडजोड .... !
तडजोड आयुष्याची
समजायला लागलेय
तेव्हापासूनच
करतोय
कुठल्याही तक्रारींशिवाय ....
डोळ्याच्या खोबणीतील पाणी
असो की ,
समुद्रातील पाणी
चवीला
दोन्हीही सारखेचं नां ....
गुपचूप
गिळून घ्यायचे
तडजोड करायची नां ....
शेवटी
किमान चार खांदे
मिळविण्यासाठी निरोपाला .... !!!