स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिन
किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला मृतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला
तरुणांनी तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मातृभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ विरमरण पत्करले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले
आईने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पणाला लावले
तरुणांनीही शस्त्र धारण केले
देशलाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.
