STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

4  

VINAYAK PATIL

Inspirational

शिक्षक

शिक्षक

1 min
201

जीवनाच्या वाटेवरी

शिक्षक असतो खरा

संस्काराच्या ठेवणीचा 

असतो वाहता झरा ||१|| 


जीवना देई आकार

मूर्ती छान घडवितो 

कारागीर हा कुशल 

कष्ट सारे उचलतो ||२|| 


शिक्षक नाही थकत 

ज्ञानदान करताना

आनंद वाटे तयाला 

सदैव शिकविताना ||३|| 


काळ्या फळ्यावरी दिला 

कानमंत्र जिंकण्याचा 

शिकविले विद्यार्थ्यांना 

दिला सागर ज्ञानाचा ||४|| 


जीवनाचा खरा अर्थ 

तुमच्यामुळे कळावा

आई नंतर प्रथम

मान गुरुस मिळावा ||५|| 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational