साने गरुजी
साने गरुजी
पालगडच्या त्या खोती घराण्यात
२४ डिसेंबर१८९९ साला जन्मले
होते पांडुरंग मुळ नाव तयाचे
मराठी साहित्याचे सानेगुरुजी झाले ||१||
लहानपणीच आईच्या शिकवणुकीचा
मोठा प्रभाव व त्यांच्यावरी पडला
मातृहृदयी असे त्यांच्या खरा तो
साहित्यांत जीवन प्रवास सुरू झाला ||२||
इंग्रजी साहित्यात एम. ए. घेऊनी पदवी
१९२८साला विद्यार्थी मासिक केले सुरू
ग्राम स्वच्छता आणि वाहुनी मैला
आपण सर्वजण त्यांचा आदर करू ||३||
लेखणी हे साने गुरुजींचे अमोघ शस्त्र
संस्कारी मुलांच्या प्रतिष्ठापनेसाठी
केले अनेक मुलांसाठी पुस्तक लेखन
देशोदेशीच्या साहित्यकृती असेअस्त्र ||४||
भारत मातेचे खरे होते पुत्र तुम्ही
कधीच विसर ना पडे जन्मदात्रीला
बलसागर भारत होवो हा तुमचा
कानमंत्र आपल्या गीतातून दिला ||५||
