STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

4  

Sangita Pawar

Inspirational

गुरुपौर्णिमा वंदू गुरुंना

गुरुपौर्णिमा वंदू गुरुंना

1 min
221

पहिला गुरु असे जीवनी

माय बाप तेथेच काशी

वात्सल्य निष्ठेचे मूर्तिमंत

साती तीर्थ तया पाशी ||


गुरु विना नाही ज्ञान काही

नेहमीअसावे शिष्य समान

शिकावे जे जे मिळेल ते

नम्र राहावे सदा संयमानं ||


शाळेमध्ये शिकविताना

शिक्षक असतात गुरु

मिळतो ज्ञानाचा सागर

जीवन अर्थ साकारू ||


 गुरुसी नेहमी जावे शरण

समर्पित व्हावे शिष्य रूपाने

आशीर्वाद त्यांचे मिळे सदा

होईल आयुष्याचे सोने ||


जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात

नाना रूपात भेटतात गुरु

सर्वांनाच करुनी वंदन

आजची गुरु पोर्णिमा करू ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational