STORYMIRROR

Poonam Waghmare

Inspirational

4  

Poonam Waghmare

Inspirational

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
246

काळे ढग जमू लागले,

लगबग लगबग पळू लागले

विजांचीही घाईच घाई,

जरा आली की परतून जाई

ढगांचा त्या आवाज भारी,

लहानगी करतात आई... आई

रिमझिम रिमझिम ताल धरुनी,

नाचत आल्या सरींवर सरी

नाचू लागले मोर, पाखरे,

पावसासोबत ताल धरुनी

मातीचा तो सुवास उठला,

सुगंधीत हा आसमंत झाला

नवरीसम डोंगर नटू लागले,

हिरवा शालू नेसून बसले

डोलू लागली झाडे, पाने,

नाचू लागली आनंदाने

फुलांचाही सडा पसरला,

स्वागताला पावसाच्या


इंद्रधनूने सजवून ठेवला,

मंडप जणू लग्नाचा


खळखळाट तो पाण्याचा,

सागर झाला दुधाचा


वराती बनून सारे निघाले,

नभ - धरतीच्या लग्नाला

व्याकुळलेली काळी माती,

भरुन पावली, पावसाने

पाणीच पाणी जिकडे तिकडे,

बरसू लागले मेघ सावळे

सुखावला तो बळीराजा ही,

मेघराजाच्या कृपेने

दुष्काळाला बसला आळा,

बहरुन आले पीक तयाचे

खळगी भरुन काढू जगाची,

हीच असे मनशा त्याची

तृप्त होऊ दे धरती सारी,

तहान भागू दे साऱ्या जनाची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational