STORYMIRROR

Poonam Waghmare

Others

3  

Poonam Waghmare

Others

कधी कधी...

कधी कधी...

1 min
416

कधी कधी ...

काय लिहावे सुचत नाही

तरी लिहावेसे वाटते

मनातले भाव सारे

एकवटावे वाटते

शब्द हे पुन्हा आठवतील की नाही

म्हणून आत्ताच कुठेतरी साठवावे वाटते

कधी कधी...

झाली जरी गर्दी शब्दांची

या गर्दीतून वाट काढावी वाटते

मोकळे करुन मनाला

केव्हातरी खूप रडावेसे वाटते

कधी कधी...

मनातल्या त्या असंख्य जखमा

भरुन काढावे वाटते

एकटीने जेव्हा पेलवत नाही तेंव्हा

सोबत कुणीतरी असावे वाटते

कधी कधी...


Rate this content
Log in