STORYMIRROR

Poonam Waghmare

Tragedy

3  

Poonam Waghmare

Tragedy

वादळी जीवन

वादळी जीवन

1 min
247

माझा न होता झालास तिचा

हे मनाला पटत नव्हते.

काही केल्या जीवनातले

वादळ शमत नव्हते,

आधार माझा काढून घेतलास

कुणाला सांगू कळत नव्हते,

ज्याच्यासाठी जग सोडलं त्यालाच मी आवडत नव्हते?

कस बाहेर पडू यातून कोणीच सांगत नव्हते.

सगळे होते जवळचे पण आधार देत नव्हते,

जगायचं कसं आणि कुठवर हेच समजत नव्हते,

पदरात होते एक फुल पण मन आनंदी नव्हते,

त्याचा आनंद का हिरावून घेतेय मी मलाच कळत नव्हते,

आज विचार केला तो तेव्हा करत नव्हते,

माझ्या जीवाची काळजी मीच करत नव्हते.

आता नाही होणार पुन्हा जे आधी करत होते,

बाळा तुझ्यासाठी मी एवढंच करू शकते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy