माझा नवरा माझा मित्र
माझा नवरा माझा मित्र
1 min
440
नवरा असलास तरी
मित्र ही आहेस तू
प्रत्येक वेळी मला समजून घेतोस तू
केला कितीही तरी, हट्ट सारेे पुुुरावतोस तू
चेहऱ्यावरील भाव माझे कसे वाचतोस तू
मनातलं माझ्या चटकन ओळखतोस तू
कितीही भांडलो तरी लगेच जवळ घेतोस तू
विरह माझा नको हे नेहमी सांगतोस तू
इतका जीव लावतोस की
भांडण विसरुन प्रेम करायला भाग पाडतोस तू
नवरेगिरीही करतोस आणि
मित्रासारखे ही वागवतोस तू
लागणारी सगळी मदत मला करतोस तू
संसारातही आपल्या रस दाखवतोस तू
