STORYMIRROR

Poonam Waghmare

Romance

3  

Poonam Waghmare

Romance

प्रेमाला वय नाही

प्रेमाला वय नाही

1 min
296

वय वाढले तरी चंद्र अजून तितकाच तरुण आहे.

४० वर्षांपूर्वी ही तू जेवढी देखणी होतीस,

तेवढीच सुदंर आजही आहेस.

तुझ्या डोळ्यातली नशा आजही बेधुंद करत आहे.

नजरेने घायाळ करणं, आजही तुला जमते आहे,

वाऱ्याची हळुवार झुळूक कानाला स्पर्श करावी

तसं तुझं हळुवार बोलणं मनाला रोमांचित करत आहे.

तुझा बांधा तेव्हाही आकर्षक होता,

आजही तू मनमोहन आहेस,

नदी सारखी तू अल्हड होतीस,

आजही तू साधी भोळी आहेस,

फुलासारखा सुंदर चेहरा तुझा,

आजही तरुणींना लाजवशील असाच आहे,

तुझ्या मिठीत स्वर्ग सुख मिळायचे,

आजही तेच समाधान देत आहेस,

तूच माझी रेखा होतीस

आणि तूच करीना आहेस,

जितके प्रेम ४० वर्षांपूर्वी करत होतो,

आजही तेवढेच करतो आहे.

आजही तू #SMBoss आहेस

सुंदर, मनमोहन अशी माझ्या दिलाची राणी आहेस.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance