STORYMIRROR

Poonam Waghmare

Others

3  

Poonam Waghmare

Others

संसार माझा

संसार माझा

1 min
181

मनात माझ्या दडलंय खूप काही

लग्नाची केली मी खूपच घाई,

सासूबाईंना होता आलं नाही आई,

सासऱ्यांना घराबाहेर काढण्याची खूपच घाई

हाताला धरून 'हे' म्हणाले, 'चल ग जाऊ या इथून बाई'

बाहेरच्यांनी समजून घेतले, पण घरच्यांनी नाही

काढून घेतले छप्पर आमचे, आसरा राहिला नाही

काय चाललंय आयुष्यात काहीच कळतं नाही

जीव ज्यांना लावला त्यांनाच कदर नाही

सोडली साथ त्यांनी पण दैव रुसले नाही

देवरुपी आई आली धाऊन, बेघर राहिले नाही

वहिनी नि भाऊराया,

तुमचे उपकार जन्मात विसरणार नाही

नवऱ्याची ही साथ लाभली, त्याच्याशिवाय घर नाही

शून्यातून उभा झाला संसार,

तुमच्याशिवाय मदत कुणाची नाही

चिमुकल्याची लागली चाहूल पण हातात आला नाही

जास्त दिवस घर माझे खाली राहिले नाही

चिमुकली आली घरा, वांजुटी राहिले नाही

सुखी झाले जीवनी उणीव कसलीच नाही

मनात माझ्या दडलं होतं हेच सारं काही.


Rate this content
Log in