स्त्री-पुरुष समता
स्त्री-पुरुष समता
तुला जन्म देणारी मीच आहे माता
पुर्वी काळी मीच होती गणमाता
पुरुष म्हणून वेळोवेळी
स्त्रीचा करतो तु अपमान
अरे तुइ-यापेक्षा तर
स्त्रीचाच इतिहास आहे महान
लक्ष्मी म्हणायचा व एक पैसा
खर्च करु नाही दयायचा
सरस्वती म्हणायचा व एक वर्ग
सूध्दा शिकू नाही दयायचा
दुर्गा म्हणायचा व शक्तीच्या देवतेला
अबला करुन तु ठेवायचा
बनवु नको मला आता या सर्वांचे प्रतीक
हुषार होत आहे आज स्त्री प्रत्येक
जिजाउच्या प्रेरणेने झाली सबला स्त्री निर्माण
अहिल्याच्या धाडसाने वाचले स्त्रीयांचे प्राण
सावित्रीच्या शिक्षणाने दूर झाले सर्व अज्ञान
स्त्रीचा विकास आता तुला नाही खपत
म्हणून पोटातच मारण्याची घेतली आहे तु शपथ
आईची दया, बहिणीची छाया
पत्नीचे प्रेम, मुलीची माया
बोल तुला किती मोलात मिळेल माइ-या राया
म्हणून आता तरी निर्माण कर
स्त्री-पुरुष समतेचा पाया
