सांगून गेले तुका
सांगून गेले तुका
सांगून गेले तुका
करु नका चुका
वृक्ष आहे आपले मित्र
त्यांना तोडू नका.
सांगून गेले तुका
करु नका चुका
आपण आहोत एकच सारे
आपसात भांडू नका
सांगून गेले तुका
करु नका चुका
विश्वासावर चालते दुनिया
देउ नका धोका
सांगून गेले तुका
करु नका चुका
कर्मानेच होशिल मोठा
याची जाणीव राखा
सांगून गेले तुका
करु नका चुका
शोषीतांना व गरजूंना
दया एक मोका
सांगून गेले तुका
करु नका चुका
शब्द आहेत आपले धन
त्यांचे शस्त्र बनवू नका
सांगून गेले तुका
करु नका चुका
आपल्यात लपून असलेला
अहंकार काढून फेका
सांगून गेले तुका
करु नका चुका
उद्योगातून मिळते समृध्दी
म्हणून उद्योजक होणे शिका
सांगून गेले तुका करु नका चुका
असाध्य ते साध्य करण्यास
अभ्यास टाळू नका
सांगून गेले तुका करु नका चुका
