विज्ञानाची आरती
विज्ञानाची आरती
जयदेव जयदेव जय जय विज्ञान
तुमच्या मुळे दूर झाले सर्व अज्ञान
रस्त्यावरून गाडी धावते,
पाण्यावरून जहाज चालते,
हवेत उडत जाते विमान
जयदेव जयदेव जय जय विज्ञान
तुमच्यामुळे अंधश्रद्धा मिटू लागली
तुमच्यामुळे बुवाबाजी घटू लागली
तुमच्यामुळे झाले सत्य-असत्याचे ज्ञान
जयदेव जयदेव जय जय विज्ञान
तुमच्यामुळे काॅम्प्युटर बनले
तुमच्यामुळे मोबाईल बनले
तुमच्यामुळे मिळाले नव-नवीन तंत्रज्ञान
जयदेव जयदेव जय जय विज्ञान
तुमच्यामुळे शिक्षण मिळाले
तुमच्यामुळे आरोग्य लाभले
तुमच्यामुळे मनुष्य झाला बलवान
जयदेव जयदेव जय जय विज्ञान. ..
