लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
धन्य धन्य तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ
बहुजन आम्ही आपले सदैव ऋणी राहू !!1!!
दिड दिवस शाळेत जाऊन
विविध साहित्य लिहिले भरभरुन
तुमचे विचार आम्ही तळागळात नेऊ
धन्य धन्य तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ !!2!!
स्वतंत्र झाला जेव्हा देश सारा
भूक्या जनतेसाठी दिला विरोधात नारा
तुमचे गीत सदैव आम्ही गाऊ
धन्य धन्य तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ !!3!!
पृथ्वी तरली जेव्हा शेषनागाच्या माथी
आपण दिली ती कष्टक-यांच्या हाती
श्रमक-यांच्या मदतीसाठी आम्ही सदैव धाऊ
धन्य धन्य तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ !!4!!
तुमच्या प्रेरणेनेच झाली प्रगती
विकासाची वाढली आता गती
तुमचे कार्य पुढे वाढवित नेऊ
हाच संकल्प जयंतीदिनी घेऊ
धन्य धन्य तुम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ !!5!!
