STORYMIRROR

Kedar Kendrekar

Inspirational

4  

Kedar Kendrekar

Inspirational

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी

1 min
647

भारतमाता स्वतंत्र झाली परदास्याच्या जोखडातूनी

आपण सारे करु साजरी स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ll धृ ll


या देशाला स्वतंत्र करण्या शुरवीर ते अनेक लढले

स्वातंत्र्याचा टिळा लावण्या कित्येकांनी रक्त सांडले

स्मरण तयांचे आपण करुया स्वातंत्र्याच्या मंगल प्रहरी ll 1 ll


जहाल – मवाळ, क्रांतिकारी, अहिंसावादि जरी मार्ग वेगळे

स्वातंत्र्याचा ध्यास घेतला भारतमाते सर्व तुझीच लेकरे

भारतमाता स्वतंत्र करण्या ऐक्य दाविले एकवटूनी ll 2 ll


एकच आमुचा देश, जरीही नाना वेश

स्वातंत्र्य हीच आशा , प्रियतम भारत देशा

स्वातंत्र्याची मशाल आम्ही अखंड चेतवली ll 3 ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational