STORYMIRROR

Kedar Kendrekar

Others

2  

Kedar Kendrekar

Others

माय मराठी आणि आम्ही

माय मराठी आणि आम्ही

1 min
69

माय मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला आहे आम्ही 

पण तिच्या संरक्षण - संवर्धनासाठी काय प्रयत्न केले आहेत आम्ही ?

किती मराठी माणसं स्वतःची स्वाक्षरी मराठीत करतात ?

किती मराठी माणसं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मराठीतच बोलतात ?

किती मराठी माणसं मराठी भाषेतील पुस्तकं वाचतात ?

किती मराठी माणसं स्वतःच्या मुलाला मराठी शाळेत शिकवतात ?

किती मराठी माणसं मराठी चित्रपट आनंदाने बघतात ?

किती मराठी माणसं मराठी नाटकांना गर्दी करतात ?

किती मराठी माणसं मराठी गाणं गुणगुणतात ?

 किती मराठी माणसं मराठी भाषेत कुशल विचारतात ?

मराठी भाषा अभिजात होईल तेव्हा होईल !

पण आपण तिला स्वतःच्या मनात अनभिषिक्त दर्जा दिला आहे का ? हा खरा प्रश्न आहे !

माय मराठी माझी कणाकणानं मरते आहे ,

दैनंदिन व्यवहारात परकेपणाची चटके सोसत आहे !

माय मराठीच्या विदारक अवस्थेची हे चित्रण आहे 

आपल्या छोट्या छोट्या कृतीतून तिच्या संवर्धनासाठी मांडलेले हेच खरे चिंतन आहे !!!


Rate this content
Log in