STORYMIRROR

Kedar Kendrekar

Inspirational

3  

Kedar Kendrekar

Inspirational

निसर्गाची महती

निसर्गाची महती

1 min
278

हे निसर्गा आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक आहोत

तुझ्या अचाट रुपाचे वर्णन नाही करता येत !


कोणी तुलाच ईश्वर म्हणते कोणी म्हणते अद्भूत शक्ती

तुझे वर्णन करताना गुंग होते मानवाची मती !


निसर्गा तू कधी सुंदर चमत्कार दाखवतोस

तर कधी रौद्र रुप धारण करतोस.


सहा ऋतु, बारा महिने, सात आठवडे, चोवीस तास

तुझ्याच कलेकलेने जीवन जगतो आम्ही.


आमचे सण, आमची संस्कृती, आमची प्रकृती

सर्व काहि चालते तुझ्याच कलेनुसार !


सनातन हिंदू धर्माने निसर्ग नियमानुसारच संस्कृती रचली

प्राचीन वेद वाङगमयाने निसर्गाचीच महती गायली.


निसर्गच श्वास झाला येथील शास्त्रीय संगीताचा

तर संगीत कलेनेदेखील निसर्गाचे गोडवे गायले !


संगीत कलेबरोबरच चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला

निसर्गाच्याच अंकित होऊन विकसित झाल्या.

भारतीयाच्या रोमारोमात भरला आहे येथील निसर्ग

मान्सुमच्या पावसाला म्हणून तर म्हणतात जीवनधारा.


कृषीप्रधान भारत देशात नैऋत्य मोसमी वारे

मान्सुम चा पाऊस जेव्हा येतो, तेव्हा सुखावतो इथला शेतकरी


शेती फुलली, पिके डोलू लागली तर खरा भारत दिसतो

मग सुखावतो इथला शेतकरी, कष्टकरी, सामान्य माणूस


निसर्गा, तुला कवेत घेण्यासाठी थोरामोठयांनी प्रयत्न केले

पण एका क्षणात तू सर्व काहि झिडकारलेस !


जेव्हा जेव्हा मानवाने तुला जिंकण्याची भाषा केली

त्याला तू बरोबर स्वत:ची जागा दाखवलीस.


निसर्गाला जिंकण्यात नव्हे तर सोबत राहण्यात मजा आहे

शाश्वत विकासाची हीच खरी परिभाषा आहे !


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational