STORYMIRROR

Kedar Kendrekar

Romance

4  

Kedar Kendrekar

Romance

पाऊस ज्याचा त्याचा ..…

पाऊस ज्याचा त्याचा ..…

1 min
307

पाऊस ज्याचा त्याचा .....

कोणाला तो आवडतो, कोणाला नावडतो 

मान्सूनचा पाऊस मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेचे चक्र चालवतो ! 


पावसाच्या आगमनाने सुखावतो इथला शेतकरी 

विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाताना पावसाची वाटते गंमत भारी !


तरुण तरुणींच्या मनावर पाऊस शहारे आणतो 

वाढत्या पावसासोबत प्रेमाची लज्जत देखील वाढवतो !


पाऊस कधी शांत तर कधी उग्र रूप दाखवतो 

तहानलेल्या धरणी मातेला बरसून शांत करतो !


" मल्हार " रागाच्या गायनाने होते पावसाची सुरुवात 

" बहार " रागाने सृष्टीत होते हिरवळीची रुजूवात ! 


हे निसर्गा पाऊस वेळेवर पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! 

पावसाच्या पाण्याचे आपण जतन करूया " जलपुनर्भरणाच्या स्वरूपात !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance