तापलेला रवी
तापलेला रवी
तापलेल्या रवीला पाणी द्यावे वाटते
करपलेल्या रोपांवर थोडे शिंपडावे वाटते
तहान त्यांची कमी माती भूक
वाढताना कोमेजली तर वाटतं भावुक
रोपे, रवी, पाणी दिनक्रम सुरू
वाढत वाढत आता लागली पसरू
पेरलेल्या दिनक्रमाचे फळ उदयास आले
चोहोबाजूंनी कसे हिरवेगार झाले
हिरवागार गालिचा मागे झाडाची सावली
वाऱ्याची झुळूक हळूच त्यातून सरकली
