STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

3  

Vasudha Naik

Inspirational

*स्वर्गाहून सुंदर*

*स्वर्गाहून सुंदर*

1 min
27.8K


आई सारखे दैवत नाही

आईसारखे सुंदर कोणी नाही

पवित्र,निर्मळ वाणी तिची

दैवत हे दुसरे वसुंधरावर

असे हे स्वर्गाहून सुंदर //१//


वसुंधरा नटली,सजली

हिरवा शालू पांघरली

पावसाचा शिडकाव

लतावेली झाले हिरवेगार

असे हे दृश्य स्वर्गाहून सुंदर फार//२//


परसात अंगणात पाखरं होती गोळा

देते त्यांना मी प्रेमाचा जिव्हाळा

देते दाणे पाजते पाणी

पाखरांच्या हालचालीवर लक्ष ठेवतेय राणी

हे देखणे दृश्य भासे अतीसुंदर

असे हे दृश्य स्वर्गाहूनी सुंदर//३//


जीवनमान दिले देवाने

मी स्विकारले आनंदाने

कधी पाहिला सुखाचा डोंगर

कधी दुःखाचा सागर

जीवनात नाही केला कशाचा अव्हेर

असे हे जीवन आहे खूपप खरं बर

असे हे सर्व स्वर्गाहून सुंदर

स्वर्गाहून सुंदर//४//


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational