Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil Chandak

Inspirational

4.8  

Anil Chandak

Inspirational

स्वर्ग होते घराचे

स्वर्ग होते घराचे

1 min
699


सांगता डोळ्यात, येते खळखळ पाणी!

स्वयंसिध्दा,वर्णिते, स्री जन्माची कहाणी !!धृ!!


सावित्रीची लेक, ईश्वराचे वरदान!

अगाध महिमा,विश्व गाते गुणगान!

मुर्तिमंत मुर्ती,असीम रणरागिणी!! 1


आदीशक्ती जननी,प्रेरणा संसाराची!

सर्वठायी भूमिकेत, मार्गदर्शकाची !

स्रोत संस्काराची, हाती बांधले कंकणी!! 2


थोरामोठ्यांची, मान मर्यादा सांभाळूनी!

चारचौघांत वागे,मिळूनी मिसळूनी !

कर्तुत्वाचे शिखर,गाठते विश्वांगणी !! 3


भोगली होती,गुलामी,बंद होते द्वार!

द्वारे शिक्षणां, भरला स्वातंत्र्य हुंकार!

उडाण घेत ,गात, मुक्त क्षितीज गाणी !! 4


अंतराळ,यानांसवे,मारते भरारी!

वेळप्रसंगी,होऊनी धाडसी करारी!

सैनिक बनुनी, बलीदान रणांगणी !! 5


प्रतिकार पुरूषांचा,स्व:त्व रक्षणाची!

नोकरी,अर्थार्जन,कसरत घरांची !

काम शमवी, रती, सखी लावण्यखणी!! 6


धर्मग्रंथ वर्णिती,नारी तुझी महती!

अबला नाही सबला,विद्वान सांगती!

तूच विश्वाची जननी,सगुण निर्गुणी !! 7


कर्तव्याची ज्योत, ती जन्मदात्री भामिनी

महत्वकांक्षी,पंडीता,विदुषी मानिनी!

स्वर्ग होते घर,हात फिरवी गृहिणी!! 8


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational