स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे
स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूराजे
आकाश स्तब्ध झाले,समुद्रही काही काळ शांत झाला
भोसलेंच्या घराण्यात सईबाईच्या पोटी
धुरंदर शिवपुत्र संभाजी जेव्हा जन्मास आला
पदस्पर्श होतात सह्याद्रीत वारा जोराचा वाहला
तरुणवयात ज्याने भार स्वराज्याचा पेलला
असंख्य असत्य आरोपाचा वार छातीवर झेलला
शत्रूला नतमस्तक करूनी स्वराज्य मंदिरी कळस चढविला
शिवरायांचा शूर, तेजस्वी, पराक्रमी छावा
राज्याभिषेकाचा मान मिळवून छत्रपती संभाजी झाला
सोळा भाषांची जाण, जणू ज्ञानाची अनमोल खाण
अवघ्या दहा वर्षे वयात ज्याने
"बुधभूषण" नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला
अल्पायु तरी शिवपुत्र शोभे ऐसा
पराक्रम त्याचा गाजला
कर्तुत्व असे थोर तयाचा डंका दाहीदिशा वाजला
मातृभूमी ही पावन झाली त्याच्या रक्ताने
साखळदंड झाले धन्य त्याच्या स्पर्शाने
झुकला नाही,मुघलांसमोर वाकला नाही
सलग बेचाळीस दिवस जाणे मृत्यू समोर पाहिला
पाहुनी शौर्य,त्याच्यापुढे मृत्यूही नतमस्तक होवून लाजला
थोर असा राजा ज्याने प्राण
आपला धर्मारक्षणासाठी वाहिला
मातृभूमी ही धन्य झाली
वीर योद्धा, कुशल सेनापती, अलौकिक महापराक्रमी संस्काराचा धनी,
भारतीयाचा मानबिंदू ,
धर्मवीर देशास लाभला
स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे
तुम्हास शतशः माझे नमन
तुमच्या अद्भुत शौर्यास,अलौकिक कार्यास करते शब्दांजली सुमन अर्पण
