स्वराज्य तोरण (पोवाडा )
स्वराज्य तोरण (पोवाडा )
महा धुरंधर शहाजी राजा , वचक त्याची यवनाला l
रगरगात भगवा भिनलेला, असा बाप शोभला ll
आई जिजाऊं पोटी महापराक्रमी परमप्रतापी पुत्र जन्माला ll
गुरु कोंडदेव घडवी त्या गोळ्याला... घडवि गोळ्याला...l
जमविले मावळ सवांगड्यास... दिला स्वराज्याचा ध्यास...ll
जी... र...हा जी जी र ही.. जी जी lll
शाहजहान बादशहा दिल्ली तखताला , दिल्ली तक्खतला l
निजामशाही नगर शहराला नगर शहराला ll
आदिलशाही राज्य विजापुराला , विजापुराला l
कुतुबशहा यवन गोवळकोंड्याला , गोवळकोंड्याला l l
सारी सत्ता मोगलाईची, आणल हिंदू राज्य संपुष्टा स l
तोंड देई मराठी जनता त्यांच्या त्रासास l l
अबला गेल्या यवणींच्या बट खान्यास l
जी... र...हा जी जी र ही.. जी जी lll
बाळ शिवाजी पाझरला, आई जिजाऊ साथीला l
चार मावळ गाठीला , तोरण बांधाव स्वराज्याला l l
स्वतंत्र करण्या तळकोकण वरघाट ।
हा कणा मराठी केला ज्यानें ताठ ।
तो धन्य शिवाजी धन्य, असा नाहीं अन्य,
वीर असामान्य, साऱ्या जगतांत l l
जी... र...हा जी जी र ही.. जी जी lll
मारूनी मेखा बुरूजाला । पागोटं बांधिले त्याला ।
हां हां म्हणती मावळा चढून वरती गेला ।।
गर्जना केली हरहर महादेव बोला ।।
बालशिवबाने तोरणा किल्ला जिंकून
स्वराज्याचे तोरण बांधला तोरण बांधला l l
जी... र...हा जी जी र ही.. जी जी lll
जिंकून तोरणा बहु धनलाभ तयासी झाला l
असा प्रचंड गड हाती तयाच्या आला तयाच्या आला
आई तोरण जाई आशिश लाभला आशिश लाभला l l
बावीस हांड्यांच धनरशी गावली l
सोबत मुरिंब डोंगर काबीज त्यांनी केला l l केला हो केला
बसविला राजमहाल त्या डोंगराला
राजगड तयाचे नाव दिधले त्याला दिधले त्याला
मावळ्यांनी त्यांना स्वराज्याचा राजा घोषित केला
जी... र...हा जी जी र ही.. जी
अशी रचली स्वराज्याची मुहूर्तमेढ
लावले मराठ्यांना स्वराज्याचे वेड
आई बापाचा आशिष शिरी
त्याला गुरु सवांगड्यांची जोड
आज सुखाचा श्वास घेतो महाराष्ट्रात
भगवा फडकवत मनामनात
निधड्या छातीचा असा वाघ नसे साऱ्या जगतात
अभिमान राजांचा श्री च्या कवनात...
तयाला दिली कुंज ने साथ
वाचकांनी ही द्यावा मनापासून प्रतिसाद
जी... र...हा जी जी र ही.. जी
स्वराज्य तोरण चढे...
गर्जती तोफांचे चौघडे...
मराठी पाऊल पडते पुढे...
मराठी पाऊल पडते पुढे...
शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व इंदापूर या भागाची सुभेदारी होती. परंतु या जहागिरीतील सर्व किल्ले आदिलशहाच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते . शिवरायांना माहीत होते की किल्ल्याशिवाय आपल्या राज्याची ताकत वाढत नाही व जर आपल्याला आदिलशाही व मुघल असल्या मोठ्या ताक दवर राज्यांसोबत लढायचे असेल तर गड-किल्ले जिंकणे गरजेचे आहे . त्यांनी किल्य्यांचे महत्व ओळखले होते . परंतु त्यांना सुरवात कुठून व कशी करावी हे लक्षात येत नव्हते . या वेळेस त्यांना मार्गदर्शन केले ते म्हणजे आई जिजाऊ यांनी .
जिजाबाई यांनी शिवाजींना किल्ले तोरणा बद्दल सांगितले . पुण्याच्या नैऋत्येस 64 किमी वर हा किल्ला आहे . कानद खोऱ्यातील हा डोंगरी किल्ला आहे . या किल्ल्या वरील 2 भक्कम माच्या .. झुंजार माची व बुधला माची ... या किल्ल्याला मजबुती देतात . किल्ल्यावर वरती जाण्यास एकच मार्ग आहे व तोही खूप कठीण आहे .
महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा व बळकट किल्ला म्हणून तोरणा किल्याची ओळख आहे . या किल्ल्यावर देवी तोरणजाईचे मंदीर आहे . हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता . परंतु या किल्ल्याकडे लक्ष कमी होते या कारणामुळे किल्ल्यावर मुबलक प्रमाणात सैनिक व दारुगोळा नव्हता . या कारणामुळे तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधण्याचे शिवरायांना ठरवले .
रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली,पण केवढे अवघड कार्य होते ते, दिल्लीचा मुगल बादशाह,विजापूरचा आदिलशाही सुलतान,गोव्याचे पोर्तुगीझ आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिम्मत नव्हती. अशा बिकट परीस्तीथत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्याफौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ पण शिवरायांचा निश्चय अढळ होता.
जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधीकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य, किल्ला ताब्यात असला,कि आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे,असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ठ किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका.
त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकाच वाट आहे. ती आहे झुंजारमाचीवरून. हि वाट अतिशय अवघड आहे.वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार ! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरनजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा 'हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते,कि दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे,असे त्यांनी ठरवले. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शीवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावाण सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला.
हिंदवी स्वराज्याची नौबत झडली.नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड' असे नाव दिले.तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरु झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या. शिबंदीत मावळे,कोळी,रामोशी,महार इत्यादी जातीजमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद,वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता.
किल्ल्याची दुरुस्ती सुरु झाली आणि काय आश्चर्य मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरीकाम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला.'शिवरायांना देवी भवानी प्रसन्नआहे,तिनेच धन दिले 'असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनांच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहोरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे, असे त्यांना वाटले.हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारुगोळा जमा केला.उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्यास ठरवले. तो बेत असा. तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवरपूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे.
शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खुप उंच,अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शीवरायांनी ठरवले.एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले 'राजगड' गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुंकला. सुतार ,गवंडी ,मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा,बारा महाल,अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड हि स्वराज्याची पहिली राजधानी सजली. शिवरायांची घोडदौड सुरु झाली. बारा मावळांतील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतलेबारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला.
