STORYMIRROR

Sunita Ghule

Romance

4  

Sunita Ghule

Romance

स्वप्नफुलोरा

स्वप्नफुलोरा

1 min
252

स्वप्नकळी फुलली अंतरंगी

मोरपीसी स्पर्शाने शहारते अंगांगी

काय,दिव्य पाहते हृदय माझे

विहरते आनंदात अवकाश सप्तरंगी।


जणू राजकुमार हातात हात घेई

सफर अंतराळी करितो दोही

स्वप्नात वचन देऊन वरितो

स्मितहास्याचे अत्तर मनमोही।


मऊशार गालिचावरी पहुडले अशी

प्रीत सुखाची धावते लहर मनभर

चित्तसागरी लाटांचा गुंजारव

राजसा,साथ देशील का जन्मभर।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance