स्वप्नभेट
स्वप्नभेट
माझ्या प्राणप्रिये येते
दररोज माझ्या स्वप्नी ;
न्याहाळते मला तिच्या
लपविलेल्या प्रेममनी.
स्वप्नी येऊन हसणे- रुसणे
जणू खेळ ऊन-पावसाचा ;
रोज स्वप्नी येणे सारा
खेळ हा आठवणींचा .
स्वप्नात फक्त माझ्या
प्राणप्रिये चेच प्रतिबिंब असते
हसून खेळून ते सारखे
मला गोंजारत असते.
तिच्या स्वप्नात विसरतो
मी विरहाची लाही ;
तिला मिठीत घेतल्याविना
मला राहवतच नाही.
वार्यासंगे जीवनमयी
स्वप्नांचा झोका झुलतो
मिलनाच्या कल्पनेने
हृदयात गुलाब फुलतो.
तिच्या मिलनाच्या कल्पनेने
मन माझे अनावर झाले ;
तिच्या सुखद गारव्याने
अंगावर शहारे आले.
तो गारवा माझ्या प्रीतीच्या
फुलाला हळूच सांगून गेला;
वाट पाहत आहे तुझी
प्राणप्रिया जा भेटावयास तिजला.

