STORYMIRROR

Radhika Joshi

Drama Fantasy

3  

Radhika Joshi

Drama Fantasy

स्वप्नातलं गाव

स्वप्नातलं गाव

1 min
146

त्या क्षितिजापार, असेल का माझ्या स्वप्नातलं गाव?

जिथे मी असेन.. माझ्या मनाची राणी,

हसणे,रुसणे,लाजणे.. साऱ्या विभ्रमांवर जणू माझीच मालकी,

नात्यांची झूल उतरवून ठेवेन.. क्षणभर कर्तव्य बाजूला सारेन,

वाहणाऱ्या निर्झराबरोबर खळखळून हसेन..

बरसणाऱ्या मेघांबरोबर मनसोक्त रडेन,

शीळ घालणाऱ्या वाऱ्याच्या सुरात सूर मिसळेन..

रंगीबेरंगी फुलपाखरांबरोबर स्वछंदपणे बागडेन,

सुखाची ही अमूल्य ठेव.. अहो, मिळाली तर प्राणपणाने जपेन,

माफ करा हं.. स्वप्नात जरा जास्तंच वहावत गेले,

पण एक गंमत सांगू?

म्हणजे माझा एक अंदाज..

बहुतेक सगळ्या लोकांना असंच काहीसं वाटत असणार खास..

म्हणूनच रमलेत सगळे आभासी जगात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama