कविता :- आदेश
कविता :- आदेश
प्रिये तुझा आदेश खालू न पडू देणे
माझे कर्तव्य आहे
तुझ्या आदेशाचे पालन केले तर
गड्याला गडी पण आहे
तुझे पण पोट आहे
तुला पण जात जात धर्म आहे
त्यात आमचे सरकार अंत्यत निष्ठुर आहे
गरिबिचा ईथे अंत्यत ज्वलंत प्रश्न आहे
त्यात तु आणि तुझे महिला सबलीकरण
करणार्या तुझ्या मास्तरांचीच काय ती तु लेक आहे
आमचा पुढारी ही हैराण आहे
तुला नेमका कशात रस आहे
आमच्या मिञांचीही अवस्था बिघडवाला तु एकटीच पुरी आहे
प्रिये तुझा आदेश खालू न देणे
माझे कर्तव्य आहे
मी एकटा पुरूष तुझ्या बापाच्या
आण तुझ्या बाई पणाची काळजी करणा-या तुझ्या
समाजसुधारकाच्या मिञ मैञीणिच्या
मौजा पुरवणे या तुझ्या सौंदर्य प्रधान जीवनशैलीवर
भाळणार्या प्रियकराचीच काय कुवत आणि अक्कल
गहाण आहे
प्रिये तुझा आदेश खालु न पडु न देणे
माझे कर्तव्य आहे
तु आणि तुझे बाई पण मी लुट लुट लुटू पाहतो
तुझ्या रूपाच्या चांदण्यात आंदळं बनून नाही
जगला तर काय तो मर्द जला समजाचा
रिती रिवाज आणि काडिचा व्यव्हार कळत नाही
व्यवहार तर लग्न मंडपात बसून कराचा असतो
गावच्या चावडीवर बसून पोटा पाण्याचं होत असतं
तर कशाला तु शाळा काॅलेजात गेली असती
आणि आरक्षण मागून उगाच आमच्या खाद्याला खांदा
लावून आपलं दुखणं घरातून उचलून कंपनीत घेवून आली असती
प्रिये तुझा आदेश खालु न पडु न देणे
माझे कर्तव्य आहे

