STORYMIRROR

Radhika Joshi

Others

3  

Radhika Joshi

Others

मन

मन

1 min
177

मन असे रेशमी धागा..बंध दोन जीवांमधला,

शब्दांविणा घडे जेथे संवाद तो अंतरीचा.


मन असे स्वछंदी पाखरु.. विहरते गगनांतरु,

कल्पनाविश्वात रमते, झुगारुनी शृंखला जणू.


मन असे आरसा..मानवी विकारांचा,

दाखवी दडलेला,चेहऱ्यामागचा चेहरा.


मन असे गूढ विवर..उगम तेथे विचारांचा,

परी थांग न लागे,अगम्य,अनोळखी भावनांचा.



Rate this content
Log in