आठवणी
आठवणी
आठवणींची कुपी..
सहजच उघडली आणि सुगंध मनामनांत दरवळला,
आठवणीच त्या,सरीतल्या मोत्यांप्रमाणे चहूबाजूंनी ओघळल्या,
काही खुपणाऱ्या,वेदनादायक... काही हळुवार मोरपिसासारख्या,मनाची तार छेडणाऱ्या,
काही खुदकन हसवणाऱ्या...काही डोळ्यांच्या कडा ओलावणाऱ्या,
काही चिऊ-काऊच्या...काही बेधुंद,जादुई क्षणांच्या,
काही यशाच्या-अपयशाच्या...काही सफलतेच्या-विफलतेच्या,
काही उधाणलेल्या... काही सुस्त,संथ,
एका आठवणीत गुंफलेली दुसरी,दुसरीत तिसरी...
रमून गेले होते त्यात...
अरे! निघायची पण आठवण राहिली नाही,
बरंय... आठवण असू द्या!!!
