Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Radhika Joshi

Abstract Inspirational

3  

Radhika Joshi

Abstract Inspirational

आरशातली ती

आरशातली ती

2 mins
170


रुढार्थाने कुरुपच,पण गुणांनी समृद्ध,

बहरलेली.

बाकीच्यांची तर बातच सोडा,पण ती सुध्दा त्याबद्दल अनभिज्ञ.

आजूबाजूच्या तथाकथित रुपगर्वितांना बघून कायम खट्टू होणारी.

आरसा तर जणू तिचा शत्रू,अगदी जरूर असेल तेव्हाच त्यात डोकावणार.

एके दिवशी मात्र फारच विचित्र घडलं,

आरशात बघताना अचानक तिचं प्रतिबिंब हरवलं..

फारच भांबावली,घाबरली..वेड्यासारखी घरातल्या प्रत्येक आरशात,काचेत,एवढंच काय,मोबाईलच्या स्क्रीनवर शोधायला लागली.

पण नाही...कुठेही तिची प्रतिमा उमटेनाच.

काय करावं,कोणाला विचारावं तेही सुधरेना.

आरसा पुसायला लागली...

कदाचित तो साफ झाल्यावर आपण दिसू ही आशा.

पुसता-पुसता आरसा अलगद बाजूला झाला,आतला मार्ग दिसू लागला.

जरा भीत-भीतच तिने आत प्रवेश केला,

आणि तिला ती दिसली..जणू तिचंच प्रतिबिंब.

प्रतिबिंब..ती माझं का मी तिचं?

आता मात्र तिचा गोंधळ उडाला.

"ये,घाबरु नको,समोरची ती बोलली.

हे आमचं आरशातलं जग,समांतर विश्वच म्हण ना.

तुझीच प्रतिमा आहे मी, सतत तुझ्याबरोबर रहाणं आणि तू जेव्हा आरशात बघशील तेव्हा तिथे दृश्यमान होणं हेच तर आहे माझं काम.

पण आरशात पाहताना सतत असतेस नाराज..

म्हणून थोडी गंमत करायची ठरवलं आज.

आरशातून झाले गायब..तुझी चांगलीच उडाली गडबड.

होता विश्वास..शोधत-शोधत इथे येशील खास.

आरशात तुझं प्रतिबिंब नाही म्हणून किती घाबरलीस."

ही उत्तरली,"मग! माझं अस्तित्त्वच संपलं ना!"

समोरची हसून बोलली,"दुसऱ्या कोणीतरी अमान्य केलं म्हणून तुझं अस्तित्त्व कसं संपेल?

अजून एक मनापासून सांग,लोकांना तुझं रुप आवडत नाही म्हणून का ही तुझी नाराजी?"

ही हळुवार स्वरात बोलली,"हो..बहुदा."

तिची प्रतिमा म्हणाली,"अगं वेडे,कुठलाही मुलामा,मुखवटा न चढवलेला तुझा पारदर्शक चेहरा,निरोगी काया आणि मन,मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेलं निखळ हसू हे सौंदर्याचे खणखणीत मापदंड तुझ्याकडे भरभरुन असताना तुला दिखाऊ,बेगडी बाह्यरूपाची गरजच काय?"

तिला हे पटलं.. मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं चेहऱ्यावर खुदकन हसू उमटलं.

आरशातली ती... आंतरिक सौंदर्य आणि आत्मविश्वासाने अधिकच तेजाळलेली.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract