STORYMIRROR

Radhika Joshi

Others

3  

Radhika Joshi

Others

बहर

बहर

1 min
4

गुलमोहर फुलताना बघायचा आहे तुझ्यासवे,

मनात बहर हा जपायचा आहे युगानुयुगे.

शुष्क..माझ्या मनाचा कातळ जलधारांच्या वर्षावात,

मोहर..तुझ्या अंगोपांगी ग्रीष्माच्या वणव्यात.

सुखाचे दान, रिक्त ओंजळीत भरभरुन पडू दे,

गुलमोहराचे एकतरी फूल माझ्या मनात फुलू दे.

मखमली फुलांच्या पायघड्या दारात,

चिमणे घरकुल सज्ज स्वागतास,

भासे जरी एकाकी..काहीसे उदास,

गुलमोहर फुललाय ना त्याच्या मनात.

वीज, वारा, वादळ, पाऊस कशाचीही नाही त्याला धास्ती,

मनातल्या फुलोऱ्याला कशाला हवी बाह्य गोष्टींची क्षिती.

ऋतू मागून ऋतू बदलले, युगामागून युगं,

बदलला नाही गुलमोहर, ना त्याचा बहर.

अशीच रहावी एखादी पाऊलवाट, घेऊन जाईल क्षितिजापार,

असंच रहावं तरल मन, झिरपेल जयांतून स्नेह, समाधान.

लोभस आठवणींचे मोती चोहीकडून ओघळू दे,

गुलमोहर फुलताना तुझ्यासवे एकदातरी पाहू दे...एकदातरी पाहू दे...


Rate this content
Log in