असंही एकदा व्हावं
असंही एकदा व्हावं
1 min
165
असंही एकदा व्हावं... ओंजळ स्तुतीसुमनांनी भरावी,
असंही एकदा व्हावं... मायेच्या वर्षावात मन चिंब भिजावं,
असंही एकदा व्हावं...गळ्यातून अचूक गांधार छेडला जावा,
असंही एकदा व्हावं...डगमगत्या क्षणी अनपेक्षित भक्कम आधार मिळावा,
असंही एकदा व्हावं...कर्तव्यपूर्तीचा क्षण अनुभवतानाच सारे बंध सुटावे, सारे बंध सुटावे!!
