मुक्त मी
मुक्त मी
खूपदा मनात येत,एकदा तुला भेटावं
राहिलेल्या गोष्टी,मनातले खेद खंत,
बोलावेसे वाटतात
सवांद नव्हताच रे आपल्यात,
घडला फक्त विसवांद..रुसवे फुगवे
तुला वाटते ते आणि तसेच,
मी तुझ्या साच्यात आखून घेतल स्वतःला
पण तू कुठेच नवहता माझ्यात
यालाच म्हणतात प्रेम,मी खरच वेडी होते
जाग आली तेव्हा,किती क्षण हातून निसटले होते
तुझ्या पुरूषार्थात तु मग्न,मी कधी तुला समजलीच नाही
प्रेम असच असत,तू म्हणशील तस,
माझी व्याख्या तुला पटलीच नाही
जेव्हा सगळं डोईजड झालं
मुक्त केलं स्वतःला..
मोकळं आभाळ,मोकळा श्वास खऱ्या अर्थाने अनुभवला
समाप्त
