STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

स्वप्नातले घरटे

स्वप्नातले घरटे

1 min
212

स्वप्न सुंदर घरट्याचे 

पाहुणी फुले मन 

चार भिंती उभारण्याचे 

आहे मी केले पण

 

नकोत नुसते दारे-खिडक्या 

हात हवा सहवासाचा 

नको नुसते छत पायऱ्या 

लोभ आहे आशीर्वादाचा 


स्वप्नातले माझे घर 

दिसे गजबजलेले

सगेसोयरे लहानथोर

भरभरून किलबिललेले 


साधुनी हा घालमेल 

बसवेन घडी कुटुंबाची 

बघुनी सगळ्यांचा ताल 

कडी सांभाळेन घराची 


जोडुनी मने नात्यातून 

गुंफीन माळ संपूर्ण 

चार भिंती उभारून 

स्वप्न करेन मी पूर्ण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational