स्वप्नात आला माझ्या कान्हा
स्वप्नात आला माझ्या कान्हा
स्वप्नांत येऊनि कालं माझ्या
मज नेले कृष्ण काठेवरी
मनाचा तोल सुटुनच गेला
पाउले चालली तुझ्या वाटेवरी
मदनाचा लावलास रंग
हाती हात घेताना
रोमरोम खुलवून गेला
स्वप्नात आला माझा कान्हा
घागर फोडलीस मीलनाची अन
रात आली चांदण्याची
डोळ्यातून मादक रस गाळीत
वाढवलीस आतुरता मीलनाची
लज्जेची मी सोडली वेस
तुझ्या प्रेमरंगात नाहताना
रोमरोम खुलवून गेला
स्वप्नात आला माझ्या कान्हा...

