STORYMIRROR

Anil Chandak

Inspirational

4  

Anil Chandak

Inspirational

स्वप्नांत दंग व्हावे

स्वप्नांत दंग व्हावे

1 min
199

स्वप्नांत, दंग व्हावे,

मदनात,मस्त व्हावे !

सुरांचे,  सुर व्हावे,

ओठाने, गीत गांवे !! धृ !!


येऊ दे,  धुंदी मनांला ,

येऊ दे,  सुस्ती तनांला!

घुमू दे, नाद   तयांचा,

गुंगवूनी, पुर्ण  तयांला। !! 1


झुळझुळ,  वाहतो  झरा,

भिरभिर, वाहतो  वारा !

लुकलुक, करतो  तारा,

रिमझिम, बरसत्या धारा !! 2


वाटते, पंख  लावूनी !

गगनांती, उंच  फिरावे!

स्वप्नांतची,बिछान्यासवे,

पाखरागती ,ते  उडावे !! 3


नदी,  मिळते  रत्नाकराला,

धरती,  मिळते  गगनांला !

भेदूनी,  बंध   मिलनांचे

संकेत,  स्पर्शुनी  क्षितीजाला!! 4


असे स्वप्न,  पाहिले  आम्ही,

मुठीत,  धरावे   विश्वाला !

रोखूनी,  श्वास   जगाचे,

भूवरी,  आणूनी स्वर्गाला !! 5


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational