Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pratibha Vibhute

Romance

4  

Pratibha Vibhute

Romance

स्वप्नांच्या पलीकडे

स्वप्नांच्या पलीकडे

1 min
641


स्वप्नांच्या पलीकडे असे

आपल्या प्रेमाचे सुंदर गाव

राजा,राणीचा सुखी संसार

प्रेम नगर असे सुंदर नाव...१!


निसर्गाचे सुंदर लेणे लेऊन

हिरवा शालू ,बुट्टेदार चोळी

पानाफुलांवर दवबिंदू मोती

गाव मात्र आहे मराठमोळी...२!


राजा,राणीने संसार थाटला

सागराचा लाभला किनारा

हिंदोळ्यावर बोटीत विहार

एकमेकांचा रे सख्या सहारा...३!


शांत,सुखमय आपले गाव

स्वप्नांच्या पलीकडे बहारदार

सागराच्या फेसाळणाऱ्या लाटा

जीवनाचे दोघेच शिल्पकार...४!


स्वप्नातील गावात फिरू सख्या

पंख लावून आकाशी अलवार

मुक्तपणे घेऊ मोकळा श्वास

खऱ्या जीवनाचा हाच रे सार..५!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance