STORYMIRROR

वर्षा अरगडे

Inspirational

3  

वर्षा अरगडे

Inspirational

स्वप्न

स्वप्न

1 min
256

रात्रीच्या छायेत

निद्रेच्या कुशीतून

रंगीबेरंगी स्वप्न जन्माला येतात.

मायेच्या पांघरूणात ती झाकलेली असतात

त्यांना पूर्ण होण्याचा शाप नसतो...

पण दिवसा उघड्या डोळ्यांनी

प्रखर प्रकाशात पाहिलेल्या

अन् अस्तित्वासाठी तळपत असलेल्या

स्वप्नांना मात्र संघर्षाचा शाप असतो...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational