STORYMIRROR

Yogita Mokde

Abstract Romance Fantasy

3  

Yogita Mokde

Abstract Romance Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
229

विश्वास बसेना स्वप्नावरती

अस्तित्वात तीच धरती,

अद्रुश्य तेही चित्र माझे

नयने माझी साकारती.


तीच पायवाट

तोच घंटानाद,

कानीं नादतो

गजरही आज.


तोच थवा उडे बगळ्यांचा

उडवूनी तुषार जलधारांचा,

एकैक थेंब चमके मोत्याचा

समुह असे तो सप्तरंगाचा.


कैक क्षण घालविले तिथे

एकाकी बसुनी क्षण जगले,

तोच शशी, त्याच जलधारा

तोच नीरज भ्रमरा संगे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract