स्वप्न
स्वप्न

1 min

11.4K
हल्ली स्वप्न बघणे जमतच नाही
दिवसभराचा शीण ते जमूच देत नाही
मुलाबाळांसह वेळ कुठे जातो कळतच नाही
हल्ली स्वप्नात रमायला वेळच मिळत नाही
धावपळ दगदग रोजचीच झाली आहे
चेहऱ्यावरली रया कुठल्या कुठे गेली आहे
आठ्यांचे जंजाळ भलतंच वाढत आहे
पैशाचं महाभारत घराघरात चालत आहे
दिवस रात्र हात पाय हिरीरीने राबत आहे
एकाच स्वप्नामागे हर एक धावत आहे
दिवास्वप्न पाहणे आता थांबवले आहे
सत्यात राहणे मी अवलंबलेले आहे