स्वप्न
स्वप्न
आयुष्याला देती अर्थ स्वप्न
स्वप्नाचा घेऊन ध्यास
करावी त्या दिशेने वाटचाल
स्वप्न बाळगावी उरास
स्वप्नपूर्तीचा आनंद
समाधान देईल मनास
स्वप्न भंगण्याचे दुःख
नका लावून घेऊ मनास
स्वप्न नव्या आशेचा किरण
स्वप्न आयुष्याची संगत
स्वप्नशिवाय नाही
आयुष्याची रंगत
स्वाती वक्ते, पुणे
