स्वप्न सोनेरी
स्वप्न सोनेरी
रंग उधळे वसंती
माझ्या पामर ऱ्हदयी ,
अल्हादित स्मृती साऱ्या
प्राण एक ते दो देही।।१।।
सृष्टीतले रंग सारे
चितारले रोम रोम,
जीव शिव एकजीव
मोरपंखी भरे व्योम ।।२।।
स्वागतास साजणाच्या
श्रृंगारले सारी थेट,
विसरले देहभान
आत्मा परमात्मा भेट।।३।।
चित्त नाही थाऱ्यावर
नाही कुणाचीही ओढ,
कृपा दृष्टी होता तुझी
भवबंध मुक्त सोड।।४।।
गोल परिघ भक्तिचा
असा अखंड राहू दे,
कांती त्याची चर्येवर
धार नितळ वाहू दे।।५।।
आकंठ धुंध अशीच
पांघरून मुढमती,
श्वास तव चरणासी
अंतिम क्षणी सद्गती।।६।।