STORYMIRROR

Dhruva Raut

Inspirational

3  

Dhruva Raut

Inspirational

स्त्रीचा सन्मान

स्त्रीचा सन्मान

1 min
363

गर्भातील त्या कलिकेला उमलू द्या ,

स्वागतास तिच्या फुलांचे तोरण बांधा,

परीसमान ती नाजूक फुलराणी,

तिला औक्षण करा,

इवले इवले पाऊल अन् गोड गुलाबी हास्य,

साऱ्यांना लळा लाविते तिचे सौंदर्य,

आई बहीण वहिनी नणंद असंख्य नात्यांची वीण 

गुंफूत जपते सारी नाती, 

गुणवान, कर्तृत्ववान, धैर्यवान आहेच ती,

प्रसंगी अत्याचाराला पायबंद घालणारी 

महिषसूरमर्दिनी आहे ती, 

नोकरी- घर प्रवास करत सांभाळते संसार ती, 

पण काळ असा येतो कधीतरी 

बलात्काराच्या जाळ्यात गुरफटते बिचारी,

अन्यायाची झालर झेलता झेलता कोलमडून जाते ती

आम्ही स्त्री संरक्षणाचे नारे मात्र देत फिरतो,

पण स्त्रीच्या सन्मानाच्या नावाखाली अजूनही मागासलेलेच विचार ठेवतो, 

 मागणे मागते एकच ह्या शुभदिनी

सन्मान करा स्त्रीच्या अस्तित्वाचा आयुष्याच्या प्रत्येक वळणावरी..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational