STORYMIRROR

Dhruva Raut

Inspirational

3  

Dhruva Raut

Inspirational

मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिन

1 min
319

कुसुमाग्रजांचा जन्मदिन हा 

साजरा करीतो मराठी भाषा दिन,

मराठी अमुची मायबोली,

तिच्या शब्दांमधुनी उमलते प्रेमाची पालवी,

महाराष्ट्राची शान आहे आमुची मराठी,

अभंगांच्या रत्नांनी सजलेली,

शाहिरी बाणा जपणारी,

अशी ही थोरवी माझ्या मराठीची,

पण एक आम्ही आहोत असे 

इंग्रजीच्या अट्टाहासापोटी लाज वाटते मराठी बोलण्याची,

अरे शिवरायांचे मावळे म्हणवून घेता ना स्वतःला,

मग बोला अभिमानाने माझी मातृभाषा मराठी,

अन् साजरा करा सोहळा या मायमराठीचा प्रत्येक क्षणी..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational