सन्मान
सन्मान
गर्भातील त्या कलिकेला उमलू द्या ,
स्वागतास तिच्या फुलांचे तोरण बांधा,
परीसमान ती नाजूक फुलराणी,
तिला औक्षण करा,
इवले इवले पाऊल अन् गोड गुलाबी हास्य,
साऱ्यांना लळा लाविते तिचे सौंदर्य,
आई बहीण वहिनी नणंद असंख्य नात्यांची विण
गुंफूत जपते सारी नाती,
गुणवान, कर्तृत्ववान, धैर्यवान आहेच ती,
प्रसंगी अत्याचाराला पायबंद घालणारी
महिषासूरमर्दिनी आहे ती,
नोकरी- घर प्रवास करत सांभाळते संसार ती,
पण काळ असा येतो कधीतरी
बलात्काराच्या जाळ्यात गुरफटते बिचारी,
अन्यायाची झालर झेलता झेलता कोलमडून जाते ती
आम्ही स्री संरक्षणाचे नारे मात्र देत फिरतो,
पण स्री च्या सन्मानाच्या नावाखाली अजूनही मागासलेले च विचार ठेवतो,
मागणे मागते एकच ह्या शुभदिनी
सन्मान करा स्त्री च्या अस्तित्वाचा आयुष्याच्या प्रत्येक वळणावरी...!
