STORYMIRROR

Dhruva Raut

Others

3  

Dhruva Raut

Others

पावसाच्या सरी

पावसाच्या सरी

1 min
188

नभोवनी आले काळे मेघ हे दाटून,

बरसले थेंब पाण्याचे नभांच्या ओंजळीमधून,

झुळझुळ झुळझुळ वारे वाहिले

अन् झरे वाहिले दरीखोऱ्यांतून,

हिरवाई च्या नजराण्याने डोळे गेले दिपून,

हिरवी शाल पांघरून सजली ही धरती नववधूसमान...

पावसाच्या ह्या सरींनी झाले अंगण ओलेचिंब,

वसुंधरेच्या गर्भातून दरवळले सुगंध,

न्हाऊन निघाले वृक्ष या पावसाच्या सरींनी ,

अन् बहरली फुले ही सुवासांनी,

गार वारा उधळला दशदिशांत ,

गर्जले मेघ हे अवकाशातून....

पावसाच्या ह्या सरींनी केली सुखाची बरसात,

पण सोबतीला आली महापुराची लाट,

महापुराने या केला मानवी आयुष्याचा घात,

अन् मानवी जीवन विरले दुःखाच्या विरहात,

म्हणून साद घालते ह्या पावसाला आज 

जप रे आता तरी मानवी जीवन आणि तुझ्यातले बंध,

हवा तितकाच पाड पाऊस वेळोवेळी,

मग होईल मानवी जीवन स्वर्गामयी..!


Rate this content
Log in