वर्गमित्र
वर्गमित्र
1 min
254
आयुष्य एक यात्रा अद्भुत
कुणाची कुणास न ओळख,
सोबत पावले टाकताना
मिटतो भितीचा काळोख॥१॥
साहित्याच्या वाटेत भेटले
अनोळखी मजला खुप,
वंदिता त्यांची पावले
प्रकटले माझ्यातले नवे रूप॥२॥
हळुहळु सगळे आपले भासले
जीवाभावाचे नवे मैतर लाभले,
संगतीत लेखणी उधळते रंग
शिकवी साहित्याचे नवे ढंग॥३॥
राग नाही द्वेष नाही कुणाचा
निखळ अक्षर प्रेमींचा कट्टा,
अधुनमधून भेटी घडतां
शब्दांचा यथासांग लावतो सट्टा॥४॥
एकमेकास शब्द देता घेतां
ऋणानुबंध जुळू लागले,
कधी न विसरतां येणारे
आपले वर्गमित्र दिसु लागले॥५॥
